अष्टविनायक : १
|| श्री मयूरेश्वर (मोरगाव) ||
मोरेश्वर/मयूरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो.
श्री मयुरेश्वर मंदिर :
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्यादगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनीमनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून यादेवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५०फूट उंचीची संरक्षण भिंत आहे .
श्री मयुरेश्वराची मूर्ती :
गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्तीबैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे.मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावरनागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूसऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
श्री मयुरेश्वराची मूर्ती :
गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्तीबैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे.मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावरनागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूसऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
आख्यायिका :
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावरउत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेरगणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असेनाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यालामोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत.असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्तीबनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली.म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचेमानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्यांपासूनबनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती,मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीलायेथेच ठेवण्यात आले.
जाण्यासाठी मार्ग :
· पुण्यापासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४कि.मी. वर आहे.
पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गावआहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३कि.मी. आहे.
पावसाळ्यात येथे मोर बघायला मिळतात.
जेवण्याची व राहण्याची सोय :
श्री माहेश्वरी भक्त निवास आहे. मेवाड भोजनालय या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था आहे.
जवळील प्रेक्षणिय स्थळे :
१) पांडेश्वर :
पांडवानी बांधलेले पांडेश्वर मंदिर आहे.
२)कऱ्हा नदी तीरावर जडभरताचे स्थान.
नदीतीरावरील शिवमंदिर उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे.
३)जेजुरी :
श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे प्रसिद्ध स्थळ आहे.
४) लवथळेश्वर :
शिवमंदिर - जेजुरी पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर आहे.
५) सासवड :
श्री संत सोपान महाराज समाधी.
६) नारायणपूर :
एकमुखी दत्ताचे मंदिर. शेजारीच नारायणेश्वरचे शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर.
जवळच श्री बालाजी मंदिर तसेच पुरंदर किल्ला आहे
जवळच श्री बालाजी मंदिर तसेच पुरंदर किल्ला आहे
|| गणपती बाप्पा मोरया ||
http;//maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment