Total Pageviews

Tuesday, 13 October 2015

पांडव लेणी, नाशिक

पांडव लेणी, नाशिक.
नाशिक येथील पांडव लेण्यांना त्रिरश्मी लेणी असेही संबोधले जाते.
इतिहास :-
पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेणीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.
सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
स्वरूप :-
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.
काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येते.
अधिक माहिती :-
या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर पाण्याची टाके आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. मात्र टेकडीवर प्राचीन काळी केलेले पाण्याचे टाके दिसून येते. या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.
पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
वाहतुक व्यवस्था :-
पंचवटी , मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून नाशिक बौद्घ लेण्यासाठी बसेस सुटतात. अंबडला जाणाऱ्या बसनेही येथे उतरता येते. तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment