Total Pageviews

Monday, 2 November 2015

दाभोळ बंदर

दाभोळ बंदर


प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते. दापोलीकडून दाभोळगावात प्रवेश करताना सडयावरून खाली दसिणारं दृश्य पाहून कुणाही रसिकाला वेड लागेल. चिपळूनकडीलयेणारी वाशिष्ठी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळगड किल्ला आणि टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर,दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारूती मंदिर, समुद्र किना-याला लागून वाढलेले सुरूचे दाटबन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड, आपल्या हिरव्यागार झावळयांचा गुच्छ करून वा-याच्याझुळकीने येणा-यांचे स्वागत, आणि जाणारांना निरोप देताना दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ता हीशोभा अवर्णनीय असते. कोकाणतल्या समुद्रकाठच्या कुठल्याही खेडयात साधारणत: असेच वातारण असते पणदाभोळच्या या पार्श्वभूमीला, प्रचंड घडामोडींच्या इतिहासाचा रक्तरंचित गूढ पडदा आहे.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिध्द बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्यानकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीन काळी दालभ्यवती होती, महिकावती होती. नंतर तीहामजाबाद होती. मैमुनाबादही एक वेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरूमककेला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंद म्हणजे मक्केचा दरवाजाअसेही म्हणतात.

इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्र विणत असते. अगदी १००वर्षांपूर्वीपर्यत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि धोटयांचा लयबद्ध ठोक्यांवर इथे सुदर वस्रे विणली जातहोती. शिवाशाहीतील आरमारांत येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. या प्रचंड इतिहाच्या खाणाखुणा येथीलकिनारपट्टीत, डोंगरांवर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात. दाभोळ गावात पडझड झालेल्या इमारती रस्तोरस्ती,डोंगरकपारीतून दिसतील. तेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चौल, शिलाहार आणि अशाच हिंदूराजवटीचा इतिहास आहे. मात्र पश्चिम पट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहिती परदेशीयांना झाली, आणि याबंदरात समुद्रमार्गे पोर्तुगूज, डच, हबशी, तुर्के, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. तेराव्या शतकाच्यामध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळपास ३०० वर्षांपासून अधिक काळ मूसलमानी सत्तांचाअंमल दाभोळवर राहिला होता. त्यातील काहींना इथल्या स्थानिक जनतेला त्रास दिला. तर काहींना आपल्यासत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेऊन सुखाचा राज्यकारभार केला. येथील मुसलमानसत्तांनी बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया, मुसलमानांशी युध्दे करावी लागली आणि त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्यभागात कबरीच कबरी जिकडेतिकडे बघायला मिळतात. त्यात पश्चिमेच्या बाजूला समुद्रकिनारी आणिडोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात. काळाच्या ओघात शिया मुसलमानांची इथे कत्तलझाली वा ते इथून गेले. व् शतकांच्या या प्रदीर्घ कालखंडात ज्यांनी चांगला कारभार केला, लढाईत जे शहिदझाले, त्याची गणना साधु-संतांत झाली, ते पीर झाले, त्यांचे दर्गे बांधण्यात आले. प्रतिवर्षी या पिरांचेभक्तगणांत हिंदू समाजही सामील आहे.

त्या काळात दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसूनजात होते, तर अरबस्तानातून अरबी घोडयांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्गहोता. आजही पंढरपूर-क-हाड-चिपळून-गुहागर रस्त्याचे विजापूर-गुहागर असेच नाव आहे. असा हा दाभोळ गावअनेकवेळा बरबाद झाला. तितकेवेळातो परत आबाद झाला. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अनेक प्रवाशांनीदाभोळला भेट दिली आणि तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत.

इतिहासात डोकावाल तर दाभोळचे इतिहासकालीन महत्त्व सहज ध्यानात येते. दाभोळचे ऐतिहासिक स्थानसांगणा-या वास्तू आज भग्नावस्थेत आहेत. काहींची जेमतेम निशाणी आहे.तर काही ठिकाणी फक्त लाहन-लहान खुणा उरल्या आहेत. दाभोळ बंदर आजही गजबजलेले असते. तेथून मुख्यत: मच्छीमारीचा व्यवसायमोठया प्रमाणावर चालतो. येथे मिळणारे विविधि प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात जातात.दिपसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी बंदरावर पाहोचल्यावर तेथे चालणारी मच्छीमार बोटींची वर्दळ, त्यावरीलकोळी-कोळीणी यांची लगबग हे सगह पाहण्यासारखं आहे. काहीजण समुद्रावरून मासेमारी करून परतलेलेअसतात तर कसही रात्रीच्या सफरीची तयारी करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे टोपल्या भरभरूनधक्क्यावर उतरत असतात. त्यांचे आकार, रंग, पाहून त्यांची नावे विचारण्याचे कुतूहल निर्माण होत. तेथेचमाशांचा बाजार भरून लिलावाद्वारे त्यांची विक्रीही होते आणि ट्रकमध्ये बर्फात घालून ते रवाना केले जातात.या वेळी धक्क्यावर चालणारा कोळी-कोळीणी संवाद, बाजारभाव, माशांची प्रतवारी, त्यांची वाहतूक हे सारंपाहताना नाक दाबावं लागलं तरी या वेगळया विश्वात आपण रमून जातो

बंदरावर उभे राहिल्यावर समोर दिसतात ती वेलदूर, धोपावे ही गावं. चिपळूनहून येणा-या या वाशिष्ठी नदीच्याखाडीचे दृश्य विहंगम दिसते. या खाडीच्या मुखाशी अंजनवेलचा किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे तर अंजनवेलगावातून चढूनही वर जाता येते. रात्रीच्या वेळी येथील दीपगृहातील फिरता प्राकशही नजरेस पडतो. डोंगरावरआधुनिकतेकडे नेण्या-या बहुचर्चित एन्रॉनच्या लाल चिमण्याही दिसतात.दाभोळ बंदरातून दर तासालासुवर्णदुर्ग शिपिंग अॅन्ड मरिन सर्व्हिसेसद्वारे फेरीबोटीने पर्यटकांबरोबरच मोटार व मोठ्या बसेसचीही वाहतूकचालते. यामुळे आपण स्वत:च्या वाहनातून पलीकडच्या तीरावर जाऊन चिपळून-गुहागर, वेळणेश्वर, हेदवीअशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन सायंकाळीपर्यंत पुन्हा अंजर्ल्यास परतू शकतो. या फेरीबोटमुळे गणपतीपुळे,रत्नागिरी ही गावे जवळ आली आहे आहेत.

भारताच्या पश्चिम किना-यावरील दाभोळ हे सर्वांत जुने बंदर आहे. या इतिहाससंपन्न प्राचीन दाभोळला आपणआवर्जून भेट द्यायला हवी.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

रांजणखळगे...निघोज

रांजणखळगे...निघोज

ढगाळलेल्या वातावरणात थंडगार गारव्याचा अनुभव घेत, रांजणासारख्या आकाराचे अर्धा किलोमिटर पसरलेले लहानमोठे निसर्गाचा आविष्कार म्हणजेच रांजणखळगे,त्यातून धबधब्यासारखे फेसाळणारे पाणी, कुकडी नदीवरील कुंडावर झुलता पूल, दोन्ही बाजूला असणाऱ्या श्री मळगंगा देवीचे मंदीर व दर्शन घेताना भाविक पहावयासमिळतात. पुणे नगर सरहद्दीवर निसर्गातील नवलामध्ये एक दिवस सुखद घालवता येतो.

पुणे व नगर जिल्ह्यात शिरूर व पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवरून कुकडी नदी वाहते. पुणे येथून रांजणगाव गणपती मार्गे टाकळी हाजी वरून कुंड पर्यटन स्थळ अवघ्या ७३किलोमिटर अंतरावर आहे. तर नगर येथून निघोज मार्गे ह्या ठिकाणावर जाण्यासाठी ७० किलोमिटर अंतर प्रवास करावा लागतो. कुंड पर्यटनस्थळावर जाऊन निसर्गाच्याचमत्काराचा अभ्यास करत मळगंगा देवीचे दर्शन करत परिसरातील निसर्गात कुटूंबासमवेत पर्यटनाचा खरा खुरा आनंद घेता येतो. कुकडी नदीवरील रांजणखळगे "कुंड पर्यटनस्थळ' याकडे जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध नाही. टाकळी हाजी व निघोज पर्यंत एसटीची सुविधा असली तरी एक दिवसाच्या प्रवासाला ती अडचण करू शकते. खासगीवाहन नेऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटता येईल. येथे दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल झाल्याने चार चाकी वाहनांना वाहतूक करून परिसरातील इतर ठिकाणे पहावयासमिळतील. येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी खासगी बसेस व शालेय शैक्षणिक सहली येत असतात.

कॉम्पॅक्ट बसॉल्ट व व्हेलिक्युलर बसॉल्ट खडकाचे थर एका आड एक आहेत. नदी प्रवाहात ते कापले गेल्याने ते नीट दिसतात. पाण्याच्या प्रवाहात लाहन मोठे भोवरे तयारहोतात. या भोवऱ्यामध्ये छोटे मोठे गोटे अडकून फिरू लागतात. नदीपात्रातील घर्षण क्रिया सुरू होते. या गोट्यांना "टूल्स' असे म्हणतात. भोवऱ्यात अडकून सतत गोल गोलफिरत राहिल्याने वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच खड्डे आणखी मोठे झाले की त्यांना रांजणासारखा आकार तयार होतो. भूशास्त्रीय परिभाषेत "पॉट होल्स' या संज्ञेने त्यांचीओळख आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी रांजणखळगी पहावयास मिळतात. मात्र कुकडी नदीवरील अर्धा किलोमिटर अंतरात असणारी ही रांजणखळगी निसर्गाचाचमत्कार समजली जातात. त्यामुळे भूशास्त्राचे अभ्यासक आवर्जून कुंड पर्यटन स्थळाला भेट देतात.

काही रांजणखळगे इतक्या जवळजवळ आहे की त्यांच्या भिंती व कडा एकमेंकामध्ये मिसळून गेल्या आहेत. कुंड मोठ्या विशाल आकाराचे असून त्याच्या खोलीची माहीती कोठेही आढळत नाही. उंच सखल भागात ही रांजणखळगे असल्यामुळे ते पावसाळ्यात धब्याधब्याचे रूप धारण करताना दिसतात. खळग्यांमधून येणारे फेसाळलेले पाणी वखडकाच्या कपारीत पाकोळ्यांनी तायर केलेली घरटी पर्यटक तासन्तास पहात असताना पहावयास मिळतात. सध्या कुकडी नदीत पाणी सोडले असल्याने फेसाळणारे पाणीपहावयास पर्यटक गर्दी करत आहेत. या रांजणखळग्यावर झुलता पूल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरून हे रांजणखळगे म्हणजेच निसर्गातील नवल पहातायेते. दोन्ही बाजूला येथे मळगंगा देवीचे मंदीर आहे. टाकळी हाजी परिसरातील विविध विकास कामातून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरात दिवसभरवास्तव करून राहाता येते.

या परिसरात या व्यतिरिक्त पुण्याहून सरळ रांजणगाव गणपतीचे दर्शन घेता येते. नगर वरून येताना दर्याबाई पाडळी मंदीर, माकडे व लवणस्तंभ पहाता येते. निघोज गावातमळगंगा देवीची बारव, गावातील भव्य मंदीर पाहावयास मिळते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

भुलेश्वर मंदिर

भुलेश्वर मंदिर....!
पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्वर. पुराणकालात देवी पार्वतीने इथे भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि त्याची महादेवांना भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून हे ठिकाण भुलेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत यवतच्या नैऋत्येस ७०० फूट मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश्य आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराची मूळ बांधणी १३ व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.

या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्प अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तीमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
१६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप - १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.

या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपर्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तीमुख, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभार्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणार्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवर्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.

मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरुपी दुर्मिळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलासलेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ् मयात व स्कंदपुराणाच्या काशिखंपात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्त्रनामात या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तीगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका  शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.

भूलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवतजवळ यावे. यवतच्या अलीकडेच उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरसकडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून आठ किलोमीटर गेलात, की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर दूरध्वनी मनोऱ्याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

सवतसडा

सवतसडा...!
सारे कोकणच खरेतर निसर्गाचा खजिना! कोकणच्या कुठल्याही वाटेवर स्वार झालो,की हा निसर्ग जागो जागी थांबवतो. चिपळूणची वेस ओलांडून एकदा परशुराम घाटाच्या दिशेने निघालो आणि घाट सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताच्या अशाच एका स्थळानेपाय खेचून घेतले- सवतसडा! वर्षां ऋतूचे प्रेमकोकणाच्या बाबतीत थोडे जास्तच.ज्येष्ठ-आषाढातल्या पहिल्यासरीपासून सुरू होणारा हा सोहळापुढे चार महिने साऱ्या कोकणाला भिजवत राहतो. पाऊस पडू लागतो,सारा मुलुख हिरवागार होतो. या हिरवाईवरून असंख्य जलधारा वाहू-धावू लागतात. यातलीचएक मोठी जलधार- सवतसडा!
मुंबई-गोवे महामार्गा लगतचा हा धबधबा चिपळूणहून ५ किलोमीटरवर.परशुरामाच्या डोंगरावर पडणारासारा पाऊस इथे या धारेतून खाली कोसळतो आणि वाशिष्ठीला जाऊन मिळतो. भोवतीने घट्ट झाडी आणि मधोमध एका उंच उघडय़ा कातळावरून कोसळणारी ही शुभ्र धार. जणू याशुभ्रतेला हिरवाईचेच कोंदण!सवतसडय़ाचे हे पहिले दर्शनच मोहातपाडते. मुख्य रस्त्यावरून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक चांगली पाऊलवाटबांधली आहे. या वाटेच्या सुरुवातीलाच सवतसडय़ाची ओळख सांगणारी एक शासकीयपाटी येते. पण तिच्यावर अगदी सुरुवातीलाच ‘‘..‘क’वर्ग पर्यटन स्थळ’असा उल्लेख येतो.पर्यटन स्थळांच्या विकासासाठी त्यांची अ, ब,क,अशी प्रतवारी केलेली आहे. त्यानुसार त्या त्या स्थळांवरखर्च केला जातो. पण या वर्गवारीचा उल्लेख असा जाहीर पाटीवर करत शासनाने जणू आपल्या लेखन अभिरुचीचे प्रदर्शनच मांडले आहे.
मोठाल्या वृक्षराजीतूनही वाट धबधब्याकडे सरकते. वाटेत झाडांच्या फांद्यांची कमानघेत हा धबधबा वेगवेगळय़ा कोनातून दिसतो. जवळ जाईपर्यंत त्याचेते विस्तीर्ण रूप आणि रोरोवणारा आवाज मन व्यापून टाकतो.शेपाचशे फूट उंचीचा तो कडा, मात्र त्याचे पोट खपाटीला गेल्याने वरून निघालेली ती धार थेट जमिनीकडे झेपावते. असंख्य धारांमधून तो पाण्याचा पदर वाटतो. जणू एखाद्यासुंदर स्त्रीने तिचे लांबसडक केस मोकळे सोडावेत,त्याप्रमाणे! आपण असे या भावमग्नतेत असतानाच कुणीतरी सांगू लागते,‘‘..त्या तिथे वर धबधब्याच्या कडय़ाच्या टोकाशीत्या दोघी सवती बसल्या होत्या.एक राजाची आवडती,तर दुसरी नावडती.नावडती आवडतीला तिची वेणी घालूनदेते असे म्हणते. तिच्या बोलण्यातील काळेबेरे लक्षात आल्याने आवडती आपला पदर हळूच नावडतीच्या ओच्यालाबांधते. वेणी होते,आवडती उठणार तोचनावडती तिला कडय़ावरून खाली ढकलते.पण तिच्याबरोबर नावडतीदेखीलखाली कोसळते..’’सवतीमत्सराचीगोष्ट सांगणारा हा धबधबा ‘सवतसडा’हे नाव घेत कोसळतअसतो.
गेली अनेक वर्षे कोसळत असलेल्या या धबधब्यानेइथे एक मोठा डोहच तयार केला आहे.त्यात पडणारी ही धार दूपर्यंततिचे तुषार उडवते. सवतसडय़ाचेहे सौंदर्य पाहता पाहता या तुषारांमध्येच भिजायला होते. सवतसडय़ाला मनात साठवावे आणि पुढे निघावे तोघाटात आणखी एक सौंदर्य विसावावाट पाहात असतो. उंच उंच जाण्यात पायथ्याचे जग,देखावा पाहण्याचे मानसशास्त्र दडल्याचे सांगितले जाते. परशुराम घाटाच्या डोंगराला असाच एक निसर्गदर्शनाचा कोन आहे. त्याला कुणी वाशिष्ठी दर्शन नाहीतर कुणी विसावा पॉइंट असेम्हणते. परशुरामघाटाचे शेवटचे वळण पार पाडतगाडी सर्वोच्च स्थानी आली,की रुंदावलेल्याया रस्त्यावरून एकदम डावीकडच्या दरीकडे सगळय़ांचेच लक्ष जाते.वाशिष्ठी नदीचे खोरे सुजलाम्सुफलाम् होऊन अवतरते.
डोंगरदऱ्यांच्या आश्रयाने, हिरवाईलासोबत घेत वाशिष्ठी मार्ग काढत असते. समोरच्या गोवळकोटला चंद्राकृती वळण घेणारी ही जणू चिपळूणचीचंद्रभागाच! तिचे हे भरलेलेपात्र, भोवतीची हिरवाई, भातशेतीचे पट्टे सारे काही मन मोहरून टाकते.कधी संध्याकाळी इथे आलो तर यासाऱ्या निसर्गदृश्यावर मावळतीचे गहिरे रंग अवतरलेले असतात. इथल्या झाडांच्या कमानीतून हे सारे पाहताना जीव गुंतून जातो. मुशाफिरीचेहे असे गहिरे रंगच मग नव्या प्रवासाची उमेद ठरतात!
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

मस्तानी तलाव

मस्तानी तलाव
पुण्याजवळचा दिवे घाट ओलांडत सासवडला जाऊ लागलो, की डावीकडे दरीतील आखीव-रेखीव मस्तानी तलाव सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात तर भोवतालच्या साऱ्या डोंगर-टेकडय़ा हिरव्यागार होतात आणि पाण्याने भरलेला हा तलाव अधिकच उठून दिसतो. या ओल्या दिवसात मुशाफिरीसाठी या दिवेघाटात जरूर वाट वाकडी करावी. पुण्यापासून साधारण १७ किलोमीटरवर वडकी गाव. या गावातूनच एक गाडी रस्ता डोंगराच्या अगदी पायथ्याशी तलावावर आणून सोडतो. एरवी घाटातून एक भिंतवजा वाटणारे हे बांधकाम जवळ जाताच एक बुलंद वास्तू वाटू लागते. सभोवतालचे डोंगर अंगावर येतात. डोंगरांचा हा वेढा आणि विस्तीर्ण जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर आपले खुजेपणही जाणवू लागते.
थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमाने खरेतर साऱ्या पेशवाईचा इतिहासच भारावलेला आहे. या प्रेमाचा स्पर्श पुण्याभोवतीच्या काही स्थळ-वास्तूंच्या नशिबीही आला. यातलीच ही एक मस्तानी तलावाची जलवास्तू. असे म्हणतात, शूर योद्धा असलेले बाजीराव पेशवे त्यांच्या विश्रांतीच्या,निवांतक्षणी पुण्याबाहेर इथे या तलावावर येत असत. इथल्या डोंगर-दऱ्यांच्या, त्यातील हिरवाईच्या, तिच्या कुशीतल्या या तलावाकाठी चार क्षण घालवत. अथांग पाण्याच्या सान्निध्यात आणि मस्तानीच्या सहवासात त्यांच्या मोहिमांचा सारा ताण नाहीसा होत असावा. एका शूर योद्धय़ाचे एक रसिक मनच यातून डोकावते.
महाराष्ट्रात अनेक गावा-शहरांजवळ ऐतिहासिक तलाव आहेत. पण या साऱ्यांमध्ये वडकीच्या मस्तानी तलावाची जागा, परिसर आणि त्याचे बांधकाम हे वैशिष्टय़पूर्ण असे आहे. थोरल्या बाजीरावांनी १४ एकर क्षेत्रात हा तलाव बांधला, पण तत्पूर्वी त्यांनी या जागेचा व परिसराचा चांगलाच अभ्यास केला होता. या भागात किती पाऊस पडतो, पाणी कुठून खाली येईल, डोंगराला कुठे चढ-उतार आहेत, या साऱ्याचा तपशिलाने विचार केलेला आहे. या संदर्भात पुण्याच्या पेशवे दप्तरात एक स्वतंत्र पत्रच आहे. ज्यामध्ये पेशव्यांच्या दोन निरीक्षकांनी नोंदवलेले वर्णन याप्रमाणे – ‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसीजे. छ. १२ मोहरमी.. सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वाचे नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तरदक्षण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्व पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात कोठे चार हात येणेप्रमाणे होते पु(ढे) उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोऱ्यांतील ओढे व दक्षणेकडील तल्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तल्यात आणिले आहेत..सदरहू लि।। प्रमाणे लिंगोजी निंबाणेकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले..’
आज अडीचशे वर्षांनंतरही तलावाचे बांधकाम खणखणीत उभे आहे. तलावाच्या भिंती सहा ते बारा फूट जाडीच्या आहेत. यातही पश्चिमेकडची 3बांधाची आडवी भिंत तर एखाद्या चिरेबंदी किल्ल्याप्रमाणे आहे. या आडव्या भिंतीला तीन बुरुजांनी भक्कम केले आहे. या बांधकामात जागोजागी छोटय़ा खोल्या,कोनाडे, भुयारी मार्ग, बसण्यासाठी ओटे-धक्के अशी रचना केली आहे. तलावाच्या काठावर गणेश, हनुमान आणि महादेवाची मंदिरे व उघडय़ावर काही देवतांच्या मूर्ती आहेत. या भिंतीवरच पूर्वी एक महाल होता. त्याच्या खांबांच्या खुणा आजही दिसतात. इथूनच एक भुयारी मार्ग तलावाशेजारच्या विहिरीत उतरतो. या तलावाशेजारी पूर्वी घोडय़ाची पागाही असल्याचे इथले गावकरी सांगतात. थोरल्या बाजीरावांनी बांधलेल्या या तलावावर नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन १७५१ मध्ये काही रक्कम खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे. पण यानंतर आजपर्यंत तब्बल अडीचशे वर्षांत या तलावाच्या वाटय़ाला फक्त उपेक्षाच आली आहे. तलावाचे खरे सौंदर्य ते इथल्या पाण्यात पण वर्षांनुवर्षांच्या उपेक्षेने तो सध्या गाळानेच भरला आहे. महात्मा फुले जलसंधारण अभियानांतर्गत २००३ मध्ये या तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली होती. पण हे कामही अन्य ‘सरकारी’ कामांप्रमाणे अर्धवट अवस्थेत राहिले. खरे तर या तलावातील गाळ काढून इथे बारमाही पाणी अडवले - साठवले तर या भागाची सिंचनाची मोठी सोय होईलच पण एका ऐतिहासिक स्मारकाचेही चांगल्या रीतीने जतन होईल. तलाव व आजूबाजूच्या वनराईमुळे हे एक वनस्पती व पक्षिनिरीक्षणासाठी चांगले सहल केंद्र ठरू शकते.
पुण्याबरोबरच राज्यातील अनेक शहरे सध्या चहू दिशांनी वाढत आहेत. या वाढत्या नागरीकरण आणि अतिक्रमणांच्या विळख्यात या शहरालगतची असंख्य स्मारके-निसर्गस्थळेही गुदमरू लागली आहेत. अशावेळी या स्थळांना वेळीच संरक्षण देत विकासाच्या चार गोष्टी केल्या नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. असो, पाण्याअभावी एरवी रुक्ष, कोरडा वाटणारा हा मस्तानी तलाव व परिसर पावसाळ्यात मात्र रसिला होतो. आजूबाजूच्या हिरवाईने त्याला तारुण्याची झालर चढते. या काळात कुठल्याही दिवशी इथे यावे, तलावाच्या काठावर तासन्तास बसून राहावे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावा,लाटांवर विहार करणाऱ्या पाणकोंबडय़ा न्याहाळाव्यात. दिवेघाटाच्या डोंगरातले, उनपावसाचे खेळ पाहावेत, निसर्ग शांतता अनुभवावी आणि समाधान घेऊन परतावे..!
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

पळसदेवमधील श्री पळसनाथ

पळसदेवमधील श्री पळसनाथ
धरणासारख्या मोठय़ा प्रकल्पात अनेक गावेच्या गावे बुडतात, विस्थापित होतात. या जलसंपादनात अनेकदा काही प्रेक्षणीय स्थळांनाही जलसमाधी मिळते. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूरजवळ साकारलेल्या उजनी जलाशयाचा असाच एक तडाखा पळसदेवमधील पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरांना बसला. यातील पळसनाथाचे मंदिर तर पूर्णपणे पाण्यात बुडाले तर काशी विश्वनाथाचे उपेक्षेच्या खाईत. भटकंतीचे वेड असणाऱ्यांनी मुद्दाम वाट वाकडी करून पाहावीत अशी ही दोन मंदिरे आहेत. दरवर्षी उन्हाळा तापू लागला, दुष्काळ पाण्याचा तळ गाठू लागला, की ही दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात.
पुणे-सोलापूर महामार्गावर ११० किलोमीटरवर पळसदेव. इंदापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी बस इथे थांबतात. या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव गाव बुडाले. गावचा हा बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्ण न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा आकार प्राप्त झाला आहे. या जुन्या गावी आलो, की एकेकाळी तालेवार असलेल्या या पळसदेवचे वैभव जागोजागी दिसू लागते. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट, नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले.
आज इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथाची कोरीव मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी विश्वनाथ पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा कोरीव प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू आपल्या मनाचा ताबाच घेते. मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा. भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे. यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात.
हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, ..पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास पुढे 'भांडपुराण' असेही नाव पडले. खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते. मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो. आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या फेऱ्यात अडकले आहे. पाण्याच्या प्रत्येक लाटेबरोबर इथल्या या कोरीव शिळा ढासळत आहेत. जनतेचे दुर्लक्ष त्याला आणखी हातभार लावत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास हे सारे मंदिरच एके दिवशी पाण्यात लुप्त होईल.
पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! हेमाडपंती वास्तुरचनेत तत्कालीन समयी भूमीज पद्धतीच्या शिखरांना विशेष महत्त्व होते. पळसदेवचे हे मंदिर त्यापैकी एक असून, अशा प्रकारची शिखर पद्धती तुरळक प्रमाणात होती. प्राचीन शिखरकलेत त्यावरील उभ्या पट्टय़ांना ‘रथ’, तर आडव्या प्रत्येक मजल्यास (थरास) भूमी असे म्हणतात. एकाखाली एक असे दाबलेले तरी स्पष्टपणे जाणवणाऱ्या या मजल्यांच्या शिखर पद्धतीस भूमीज शिखर पद्धत म्हणतात. येथील शिखरावर असे सात मजले असल्याने ते सप्तभूमीज पद्धतीचे शिखर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या शिखर रचनेत प्राचीन वास्तुकलेतील शुकनास प्रकारही दिसून येत आहे. या वैशिष्टय़पूर्ण शिखर पद्धतीतूनच आपल्याकडील प्रसिद्ध अशा ‘नांगर’ व द्राविड या दोन शिखर पद्धती स्वतंत्रपणे पुढे आल्या. अशा पद्धतीचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंती प्रकारातील म्हणून संबोधले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे मंदिर पाण्यात जाण्यापूर्वी ३५ वर्षांपूर्वी पळसदेवच्या ग्रामस्थांनी त्या वेळी हलविले असून, नव्या गावठाणात नवीन मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आहे. तत्कालीन समयी पळसदेव ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन या मंदिरातील शिवलिंग व काही विरगळी व प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला पळसदेवच्या ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नाही. शंभर चौरस मीटरच्या भागात हे प्राचीन अवशेष मिळाले असून यामध्ये पश्चिमाभिमुख असलेले पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्टय़े या मंदिरात असून, मंदिराची ही एकूण रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मंदिराशेजारीच बलीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके १०१९ असा उल्लेख आढळल्याने त्यास लिखित आधारही प्राप्त होत आहे.
मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. कधी १९७५ साली पाण्यात बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते. या वेळी पुरातत्त्व अभ्यासक, इतिहास संशोधक, पर्यटक, यात्रेकरू यांनी मोठय़ा संख्येने या मंदिरास भेट दिली होती. या वेळी हे मंदिर वाचविण्याविषयी, त्याच्या पुनरुज्जीवनाविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. पण ही फक्त चर्चाच राहिली आणि पुढच्याच पावसाळ्यात हे मंदिर पुन्हा उजनीत लुप्त झाले. खरेतर शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील साखर कारखाने, ग्रामस्थ यांनी मनावर घेतले तर पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे शेजारी मूळ गावाच्या जागीच पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. नागार्जुन कोंडा इथे धरण साकारण्यापूर्वी तिथल्या प्राचीन मंदिरांचे पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अशाच पद्धतीने अन्यत्र पुनर्वसन केल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे.
पण हा असला विचार देखील आपल्याकडे होत नाही. ही मंदिरे वाचविण्यापेक्षा आम्ही गावोगावी सध्या बेढब-रंगीबेरंगी मंदिरे आणि स्वागतकमानी उभारत आहोत. दरवर्षी इथे आले आणि इथली ढासळणारी शिल्पं पाहिली की त्रास होतो. काळजात धस्स होते. आज दिसणारे हे वैभव उद्या दिसेल का, असा प्रश्न सतावू लागतो. पळसदेवचे हे शिल्प-सौंदर्य शापित वाटू लागते!
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार)

आदिशक्ती श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार)
श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार) हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या पश्चिमेस रडतूंडीच्या घाटतून सहा मैल अंतरावर आहे. या रडतूंडीच्या घाटाचा नामोलेख इतिहासात आहे, तर प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. सध्याच्या महाबळेश्वर - पार या रस्त्याने हा मार्ग केवळ २० कि.मी. आहे. छ्त्रपतीच्या कालखंडमथ्ये पार्वतीपूर (पार) हे गाव एक महत्वाची बाजारपेठ होती. सातारा – वार्इ - मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्हयातील महाड पोलदपूर इत्यादी ठिकाणाहून व्यापारी लोक पारला येवून मोठा बाजर भरवत असत. हे गाव एक मोठी व्यापारी पेठ होती. त्यामु ळेच या गावचे विभाजन करून पारपार, पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली व वेगवेग ळी मुलखी व पोलीस पाटिल व्यवस्था केली.
श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठतील एक जागॄत शक्तीपीठ आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व हिंदू - मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची ही कुलदैवत आहे.
देवालय परिसर
श्रीरामवरदायिनी आईचे सुंदर देवालय हेमाडंपंथी पध्दतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभिकरण केले असलेल्याने मंदिराच्या सौंदर्यात अमाप भर पडली आहे. मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे तेथे बगाड लागते. सहयाद्रीच्या कुशीत घनदाट वनरार्इत नटलेले हे गाव. निसर्गाने अतिशय उदार अंत:करणानं अनोखे असे सॄष्टीसौंदर्य हया पावन परिसराला बहाल केले आहे. जवळूनच वाहणारी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी व छ्त्रपतीच्या का ळात या नदीवर बांधलेला प्राचीन पुल हे या गावच्या सौंदर्यात आणखी एक आभूषण.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com